Hiraman Khoskar Join NCP : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे दिल्ली दौरे सुरु आहेत, तर काही नेते राज्यातील विविध मतदारसंघात दौरे करत कामाचा आढावा घेत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’

अजित पवारांनी काय म्हटलं?

“इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो”, असं अजित पवारांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यांनी ही भेट का घेतली? यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रियाही दिली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हिरामण खोसकर हे काँग्रेसवर नाराज असल्याचीही चर्चा होती. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती. यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. यातच क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिकीट देणार नसल्याचं बोललं जात होतं. यातच आता हिरामण खोसकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Story img Loader