औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी सभा घेणार आहेत. मात्र यापूर्वीच शहरातील सुभेदारी विश्रामगृहात इतिहास संशोधक व प्रख्यात वक्ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंवर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरुन निशाणा साधलाय. यावेळी बोलताना कोकाटे यांनी ‘राज ठाकरे हे पुरंदरेंचं समर्थन करत असल्याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्यात त्यांचा सुद्धा सहभाग आहे’, ‘पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहून घृणास्पद काम केलं आहे’, ‘राज ठाकरेंना आमचा विरोध कायम राहील’, ‘पुरंदरेच खरे जेम्स लेन आहेत’ अशी वक्तव्य करत राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधलाय.

नक्की पाहा हे फोटो >> “राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून जिजाऊ हिंदू नाहीत का?; छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या…”

घृणास्पद काम पुरंदरेंनी केलं
“राज ठाकरे हे सातत्याने बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करत असतात. हे आक्षेपार्ह आणि निंदाजनक आहे. त्याचं कारण असं की बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचं चरित्रहनन केलेलं आहे. बदनामीकारक मजकूर लिहिलेला आहे. तो जेम्स लेन आला आणि बदनामी करुन गेला, असं एक दोन दिवसांमध्ये घडलेलं नाही तर पुरंदरेंनी सातत्याने त्यांच्या पुस्तकांमध्ये शहाजी महाराज हजर असतानाच गैरहजर दाखवणं, तसेच दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, मार्गदर्शक आणि शिक्षक नसताना, त्यांना सतत सोबत दाखवण्याचं अत्यंत घृणास्पद काम पुरंदरेंनी केलेलं आहे केलं आहे,” अशी टीका कोकाटे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केली.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
sanjay raut raj thackeray (2)
Raj Thackeray : “मोरारजींनंतर राज ठाकरेच, त्यांच्या म्हणण्याला किंमत नाही”; संजय राऊतांची बोचरी टीका!
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

नक्की वाचा >> औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर…; राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेला पोलिसांची सूचना

करुन दिली ती आठवण
“याच पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा घोळ घातलेला होता. याच पुरंदरेंनी सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेमध्ये जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुक केलं होतं. त्यांनी पुस्तक आणि लेखकाचं कौतुक केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला आणि त्यातून भांडारकर संस्थेवरती कारवाई झाली. भांडारकर संस्थेवर कारवाई होण्यापूर्वी पुण्यातील शिवप्रेमींनी जेम्स लेनसोबतच्या एका पुस्तकाचे सहलेखक असणाऱ्या श्रीकांत बहुलकरांना काळं फासलं होतं. त्या श्रीकांत बहुलकारांच्या घरी जाऊन राज ठाकरेंनी बहुलकरांची माफी मागितली होती,” अशी आठवण कोकाटेंनी सांगितली.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर…”; राज ठाकरेंना पत्रकार परिषदेमधून इशारा

राज ठाकरे महाराजांच्या बदनामीमध्ये सहभागी
“राज यांनी बहुलकरांची माफी मागितली म्हणजे शिवरायांची बदनामी करणाऱ्या लेनला मदत करणाऱ्यांना राज ठाकरेंनी मदत केली आहे. म्हणजे राज ठाकरे सुद्धा शिवरायांच्या बदनामीच्या कटामधील एक व्यक्ती आहे. जो व्यक्ती शिवरायांच्या बदनामीच्या कटामध्ये सहभागी आहे, जो व्यक्ती सातत्याने पुरंदरेंचं समर्थन करतो,” अशी टीका कोकाटे यांनी राज ठाकरेंवर केलीय.

नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

हे स्वातंत्र्य राज ठाकरेंना कोणी दिलं?
“हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही असं तुम्हाला वाटतं का?”, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना, “त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घ्यावा की नाही याबद्दल आमचं काही मत नाही. भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला आपआपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. संविधानानेच सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीला आपआपल्या धर्मानुसार वागण्याचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. तो राज ठाकरेंना देखील आहे. पण याचा अर्थ महापुरुषांचं चरित्रहनन करणं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं स्वातंत्र्य राज ठाकरेंना दिलं कोणी?”, असा प्रश्न कोकाटेंनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला; म्हणाले, “आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर…”

गेल्या १५ वर्षांपासून राज ठाकरेंविरोधात बोलतोय…
“गेल्या १५ वर्षांपासून आमची त्यांच्याविरोधात भूमिका आहे. जेव्हा भंडारकर प्रकरण घडलं तेव्हा आमची राज ठाकरेंविरोधात भूमिका होती. त्यानंतर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने हटवला होता तेव्हा राज ठाकरेंनी पुतळ्याचं समर्थन केलं होतं. तेव्हा देखील आम्ही राज यांच्याविरोधात भूमिका मांडलेली. २०१४ ला आम्ही त्यांच्याविरोधात होतो. अगदी २०१९ ला ते काँग्रेस, राष्ट्रवादीला पुरक भूमिका घेत होते तेव्हा महाराष्ट्राच्या बड्या नेत्याचा मला निरोप आला राज ठाकरेंच्याविरोधात तुम्ही भूमिका घेऊ नका. तरी आम्ही राज ठाकरेंविरोधात २०१९ ला भूमिका घेतली. केवळ औरंगाबादला सभा आहे म्हणून आमचा विरोध आहे असं नाही, कायम आमचा राज ठाकरेंना विरोध राहील,” असंही यावेळी कोकाटे म्हणाले.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

राज ठाकरेंच्या सभेला लोक करमणूक म्हणून जातात…
“राज ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या या हिंदुत्वाकडे तुम्ही कसं बघता,” असा प्रश्नही यावेळी पत्रकारांनी कोकाटेंना विचारला. त्यावर बोलताना कोकाटे यांनी, “राज ठाकरेंच्या सभेला एवढी गर्दी असते तर त्याचं मतांमध्ये का रुपांतर होत नाही. अनेक लोक मनोरंजन आणि करमणूक म्हणून त्यांच्या सभेला जातात. त्यांनी राजकीय दृष्ट्या मोठं व्हावं की लहान व्हावं, त्यांना विजय मिळावा की पराभव व्हावा याबद्दलचं राजकीय भाष्य मी करणार नाही फक्त ते छत्रपती शिवाजी राजेंची बदनामी करणाऱ्यांचं समर्थन करतात याला आमचा विरोध आहे,” असं म्हणाले.

नक्की वाचा >> “मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने कधीही दिलेला नाही; त्यांनी असा एक तरी…”; राज यांना खुलं आव्हान

जिजाऊ हिंदू नव्हत्या का?
तसेच पुढे बोलताना, “जर राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतात तर शिवाजी महाराज हिंदू नव्हते का? जिजाऊ हिंदू नाहीत का राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून? मग हिंदूच्या महापुरुषांची बदनामी होत असताना त्या बदनामी करणाऱ्याचं ठाकरे समर्थन कसं काय करतात? त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हे बसतं का? एकदा त्यांनी वा. सी. बेंद्रे, सेतुमाधव पगडी, कृष्णाजी अर्जून केळूसकर, त्र्यंबक शंकर शेजवलकर एवढचं काय प्रबोधनकारांची पुस्तकं वाचावीत. मग ते जे काय पुरंदरेंच्या भक्तीत अडकलेले आहेत त्यातून ते बाहेर पडतील,” असा टोला कोकाटेंनी लागवला.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे आणखीन आपटणार…
“पुरंदरेच खरे जेम्स लेन आहेत ही इथल्या अभ्यासकांची, विचारवंताची भूमिका आहे. म्हणूनच शिवराजांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंचं समर्थन कराणारे राज ठाकरे अनेकदा तोंडावर आपटलेले आहेत ते आणखीन सुद्धा आपटणार आहेत हे लक्षात ठेवा. राज ठाकरेंनी थोडं आत्मचिंतन करावं,” असा सल्ला कोकाटेंनी दिलाय.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

पुरंदरेंचं तुम्ही समर्थन करत असाल तर…
“राज ठाकरेंना कोणीतरी समजून सांगावं की तुमच्या पक्षाचे १३ आमदार होते. आज किती आहे एक आहे. त्याची अनेक कारणं आहेत. मला राजकीय भाष्य करायचं नाहीय पण त्यामागील महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे जे पुरंदरेंचं समर्थन करतात त्यामुळे त्याचं राजकीय अध:पतन झालेलं आहे. त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. म्हणून राज ठाकरेंना आम्ही इशारा देतोय की पुरंदरेंचं तुम्ही समर्थन करत असाल तर तुम्हाला आमचा विरोध कायम राहील,” असंही कोकाटे म्हणाले आहेत.

महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही
“तुम्ही पुरंदरेंचं समर्थन करता म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवाजी राजेंच्या बदनामीचं समर्थन करत आहात. राज ठाकरे तुम्ही माफी मागा अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असा इशाराही कोकाटेंनी राज यांना दिलाय.