रत्नागिरी : मद्यधुंद अवस्थेत तरुणाने दोन गाड्यांना ठोकर मारली. रत्नागिरीतील माळनाका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयादरम्यान “हिट अँड रन”चा हा प्रकार मंगळवार ६ ऑगस्टला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत राहणारा आरिफ पठाण या तरुणाने दारू पिऊन लांजामधील डॉक्टर सुहास देसाई यांच्या मालकीची व्हॅगनार गाडी क्रमांक एमएच ०८ एएन ०८१८ घेऊन दोन गाड्यांना धडक मारली. आरिफ हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. मात्र त्याच्या ताब्यात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने त्याने दोन वाहनांना ठोकर मारली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही मोठी दुर्घटना होता होता टळली, असे घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी सांगितले.

हेही वाचा – अलिबाग विरार मार्गिकेतही विरोधाचा खोडा, दोन वर्षांत रायगडात २० टक्केही भूसंपादन पूर्ण नाही

हेही वाचा – Parambir Singh : “अनिल देशमुखांच्या ‘वसुली’बाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना कल्पना होती, पण..”; परमबीर सिंह यांचा आरोप

यावेळी मोठा जमाव गोळा झाल्याने या जमावाने आरिफ याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली असता तो जास्त मद्य प्राशन केले असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.