Cash For Votes in Maharashtra Assembly Election 2024 विनोद तावडेंवर बविआने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यामुळे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये राडा सुरु आहे. या प्रकरणी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुरु केली होती. मात्र ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही असं सांगण्यात आलं. यानंतर आता विनोद तावडेंना आम्ही सोडून दिलं, त्यांच्याकडे बोलायला आहेच काय? असं म्हणत हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांनी नवा आरोप केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. विनोद तावडेंनी सदरचे आरोप फेटाळले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांनी नवे आरोप केले आहेत.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
independent manifestos due to credulism no coordination between the three parties in the Grand Alliance print politics news
श्रेयवादामुळे स्वतंत्र जाहीरनामे; महायुतीतील तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे उघड
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर?

“विनोद तावडे यांच्याकडे बोलायला काही आहे का? पैसे वाटप किंवा मिटिंग करायची असते का? पोलिसांनी आमची पत्रकार परिषद थांबवली आहे. कारण निवडणूक आयोगाने सांगितलं, आता हे सगळं अडचणीत येईल भाजपाच्या त्यामुळे सांगण्यात आलं की आचारसंहिता असल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही. हे कुठल्या आचारसंहितेत लिहिलं आहे. उलट माध्यमांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे.” असं हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur )म्हणाले.

हे पण वाचा- Supriya Sule : “विनोदजी, मला धक्का बसलाय की…”, तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

विनोद तावडेंना सोडून दिलं चला..

हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले, “डीसीपी मॅडम म्हणाल्या की पत्रकार परिषद थांबवा आम्ही थांबवली. माझ्यावर कुठलाही दबाव वगैरे काहीही नाही. काही प्रश्नच येत नाही. कुणाच्या बापाचं प्रेशर मी घेत नाही. पैसे मोठ्या प्रमाणावर आहेत. मला त्यांनी ५० फोन केले, आता आहे ते मिटवा, आपण मित्र आहेत. जाऊ द्या विनोद तावडेंना सोडून दिलं. एका खोलीत १० लाख, कुठे दोन लाख, कुठे पाच लाख असे पैसे मिळाले आहेत. कुठे किती पैसे मिळाले ते पोलिसांना विचारा. पैसे काय माझे होते का? मतदानाच्या ४८ तास आधी सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असतं. विनोद तावडे इकडे आले कसे? आमचे आरोप विनोद तावडे सहन करु शकत नाही. त्यामुळे ती पत्रकार परिषद थांबवली.” असंही हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) म्हणाले.