इगतपुरीच्या हितेश निकमने येथील धडपड मंच, लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्था आणि नाशिक जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘येवला श्री’चा मान मिळविला. नगराध्यक्ष नीलेश पटेल व अशोक देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत ७२ जणांनी सहभाग घेतला. ५५ किलो गटात नितीन बागूल, ६० किलो गटात पवन पवार, ६५ किलोमध्ये उबेदूर रहेमान, ७० किलो गटात श्रीकांत राव, तर ७५ किलो गटात हितेश निकम यांनी गटवार विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत हितेश निकमने परीक्षकांचे मन जिंकत २०१३चा येवला श्री किताब मिळविला. मालेगावच्या अल अजीज जिमखान्याच्या उबेदूर रहेमानने उत्कृष्ट प्रदर्शनासाठी, तर नाशिकच्या हेल्थ अॅण्ड मोर जिमखान्याच्या पुंडलिक सदगीरने प्रगतिशील शरीरसौष्ठवपटू म्हणून मान मिळविला. विजयी स्पर्धकांना लक्ष्मीनारायण राठी संस्थेचे विश्वस्त अशोक देशपांडे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, रामदास दराडे, डॉ. संदीप गुंडरे, डॉ. डी. के. चोपडे, धनंजय काळे, नगरसेवक सचिन शिंदे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर यांनी केले.
हितेश निकम ‘येवला श्री’
इगतपुरीच्या हितेश निकमने येथील धडपड मंच, लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्था आणि नाशिक जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘येवला श्री’चा मान मिळविला.
First published on: 19-02-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitesh nikam yeola shree