जगातील अनेक देशांमध्ये हयुमन मेटा न्युमोनिया व्हायरस ( HMPV ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. आपल्या देशात आजपर्यंत एकूण सात रुग्ण कर्नाटक, तामिळनाडू महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आढळून आले. त्यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होवून घरी गेला आहे. उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध आणि इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

मंत्रालयीन दालनात एचएमपीव्ही विषाणू संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ रमण घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की काही राज्यांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणे आढळून आलेली आहेत. पण आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कारण सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वं लागू करणार आहे. तसंच या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करुन साथ पसरू नये म्हणून सगळी काळजी घेण्यात येईल.

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
Fishing boat sinks in sea near Alibaug 15 sailors safe
अलिबागजवळ समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका
Even 25 percent of work of Jal Jeevan Mission scheme in district is incomplete says bhaskar jadhav
जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये पाण्यात- आमदार भास्कर जाधव
Who are you to stop construction of Sambhaji Maharajs statue says Shivendrasinh Raje
संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी रोखणारे तुम्ही कोण- शिवेंद्रसिंहराजे

राज्यात दोन रुग्ण आढळले आहेत पण काळजीचं कारण नाही-मुश्रीफ

राज्यात एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळले आहेत. मात्र काळजीचं कारण नाही. सगळ्या रुग्णालयांतील अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण यासाठी तयारीत रहावं. अतिरिक्त व मुबलक औषधांसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, अशा सूचनाही हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. एचमपीव्हीचा प्रादुर्भाव राज्यात होऊ नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अशा सूचनाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

हे पण वाचा- Pune HMPV Update: विविध स्तरावर जनजागृती, मनपाच्या आरोग्य प्रमुखांची माहिती

HMPV बाबत मार्गदर्शक तत्वे लवकरच लागू होणार

HMPV विषाणूसंबंधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. प्रतिबंधात्मक उपाय व सतर्कतेचा एक भाग म्हणून नागरिकांनी खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमालाने नाक व तोंड झाकण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुणे, ताप तसं खोकला आणि शिंका अथवा सर्दी पडश्या सारखे लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे व वैद्यकीय सल्यानुसार औषधं घ्यावीत. भरपूर पाणी पिणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावं. यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेष करून संशयित रुग्णांपासून दूर राहून सदर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader