राष्ट्र सेवा दल कडून लोकशाही उत्सव अंतर्गत मिरज येथे तृतीयपंथी मोना तुपलोंडे सांगली यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. लोकशाही उत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील तृतीयपंथी मोना तुपलोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, समाजातील वंचित घटकांना भारतीय संविधानाने सन्मान मिळवून दिला व समानतेची आणि संधीची समानता दिली. म्हणून भारतीय संविधान जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
हेही वाचा- पुणे – सातारा मार्गावर वाहनांची गर्दी; पाचगणी, महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाटही हाऊसफुल्ल
यानंतर वाळवे गल्ली येथे प्रजासत्ताक संविधान फेरी काढण्यात आली. यात संविधानाचे व प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगणारे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या. यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर सावित्री उत्सव अंतर्गत निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहीत शिंदे यांनी केले तर समतेची राष्ट्रभक्ती गीते किरण कांबळे व राहत सातारमेकर यांनी गायिली व कार्यक्रमाचे आभार किरण कांबळे यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन हेरंब माळी, वैष्णवी जाधव, प्रसाद पवार, दीपक मगदूम, प्रकाश पवार, ऐश्वर्या माने, राज कांबळे, अक्षय पवार, सौरभ सूनके, गौरव घाटगे, अदिती घाटगे, योगेश घाटगे, शिवानंद हिप्परगी, प्रशांत जाधव, रवी शितोळे आदींनी केले होते.