माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे परमबीर सिंहच आता सापडेनासे झाले आहेत. खुद्द तपास यंत्रणांनाच संशय आहे की ते देश सोडून फरार झाले आहेत. कारण राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं. मात्र, तरीदेखील परमबीर सिंह चौकशीसाठी फिरकले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंह आहेत कुठे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधिकारी म्हणून ज्या विभागाच्या अखत्यारीत परमबीर सिंह येतात, त्या गृह विभागाला देखील त्यांच्याविषयी माहिती नाही. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“परवानगीशिवाय ते बाहेर जाऊ शकत नाहीत”

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकलं की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत”, असं वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह रशियात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर गृहमंत्री बोलत होते.

परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस

दरम्यान, परमबीरदरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. आणि जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती चांगली बाब नाही”, असं देखील वळसे पाटील म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग हे देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. राज्य सरकारने कारवाईच्या दृष्टीने पावले टाकल्यावर परमबीर सिंद यांनी मुंबई सोडून चंडीगडमध्ये आश्रय घेतला होता. वैद्यकीय कारणास्तव सिंह सुट्टीवर आहेत. या काळात त्यांनी चंडीगडमधील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाठविल्याचं सांगण्यात येतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.