राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये फोडलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बची जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रविण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन या पेनड्राईव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर ठेवलं होतं. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताधाऱ्यांवर टीका होत असताना आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या या पेनड्राईव्ह बॉम्बला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टिंग प्रकरण सीआयडीकडे वर्ग

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या तपासाविषयी दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता त्याबाबत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. “आम्ही तो भाग सीआयडीकडे वर्ग केला आहे. सीआयडी त्याचा तपास करेल”, असं ते म्हणाले.

सरकारबद्दल वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

दरम्यान, अशा प्रकारे आरोप करून सरकारबद्दल वातावरण बिघडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. “ही एक नवीन पद्धत काढली आहे. एक तर खोटे आरोप करायचे. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायची. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. जो संबंध नाही, तो जोडायचा. त्यातून सरकारबद्दल वातावरण बिघडवायचा प्रयत्न करायचा”, असं ते म्हणाले.

“एकीकडे कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे लहान गोष्टींवरून मोठमोठे मोर्चे काढायचे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मला वाटतं की सरकारची प्रतिमा असल्या गोष्टींमुळे बिघडणार नाही. आम्ही पारदर्शीपणे काम करतो आहोत. भविष्यात देखील करत राहणार”, असं देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.