महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्रदान सोहळा मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आज (२६ डिसेंबर) पार पडला. या विद्यापीठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत.
कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्याोगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता हे कार्यक्रमास उपस्थित होते.
j
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली होती. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले होते.
जपान दौऱ्यादरम्यान वाकायामाचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत बैठक झाली फडणवीसांची बैठक झाली होती. त्या वेळी कोयाचो येथील मेयर योशिया हिरानो, कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो, वाकायामाचे परराष्ट्र व्यवहार संचालक योशितो यामाशिता आदी उपस्थित होते. जपानमधील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी विशेष कक्ष स्थापन करून गुंतवणूकवाढीला चालना देण्यात येईल. गव्हर्नर किशिमोटो म्हणाले की, महाराष्ट्रातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर काम करण्याची आमची इच्छा आहे. जपानमधील उद्योजक व व्यावसायिकांचे शिष्टमंडळ घेऊन मी महाराष्ट्रात येईन.