जिंतूरचे नवनिर्वाचित आमदार विजय भांबळे यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमाआधी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटांचे एकूण पाच जण जखमी झाले. तालुक्यातील बामणी गावी हा प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला. दोन्ही गटांचे कार्यकत्रे भांबळे समर्थक आहेत.
बामणी येथे भांबळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. बामणी येथील मातंग समाजाचे कार्यकत्रे अमोल रणखांब यांनी हा कार्यक्रम ठेवला. भांबळे यांचे आगमन झाल्यावर गावातल्या एका गटाने आधी आमचा सत्कार स्वीकारा, अशी भूमिका घेतली. आधी गावातल्या महादेव मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही केलेला सत्कार स्वीकारा व नंतर मातंग समाजाच्या सत्कार समारंभाकडे जा, असे गावातल्या गटाने भांबळे यांना सांगितले.
गावक ऱ्यांची समजूत घालत भांबळे हे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभस्थळी आले. त्यांच्यासमवेत आलेल्या विलास कैलासराव देशमुख यांच्या उपस्थितीस आयोजकांनी हरकत घेतली. या वेळी झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले. गावातल्या लोकांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी उभारलेल्या तंबूजवळ गोंधळ घातला. घटनास्थळी असलेल्या टेबलांचीही तोडफोड केली. आपल्याच समर्थक दोन गटांत हा प्रकार घडत असल्याचे पाहून भांबळे तेथून तत्काळ बाहेर पडले. भांबळे गावातून बाहेर पडल्यानंतर गावातल्या गटाने मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत शिवाजी देशमुख, भास्कर देशमुख, रामा देशमुख, सुभाष कुरील हे दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले. पकी सुभाष कुरील यास परभणीच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा जमाव पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गावातल्या दुसऱ्या गटाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. पोलीस ठाण्यावर दगडफेकीचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस व राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तास तनात करण्यात आली. पोलिसांनी पांडुरंग रणखांब व अन्य लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. शिवाजी जाधवसह ८०जणांविरुद्ध पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

Story img Loader