शहरातील लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित बालकवी संमेलनातील विजेत्यांना कविवर्य दासू वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर, ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे, कवी किशोर पाठक, मुकुंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वैद्य यांनी आपल्या भाषणात, लोकहितवादींच्या नावाने मंडळ स्थापन करून कुसुमाग्रजांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला. मुले कविता कशी लिहितात, यापेक्षा ती कविता कशी वाचतात किंवा म्हणतात ही गोष्ट महत्त्वाची आहे. याकरिता वाचन करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. संमेलनात जिल्ह्यातून १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धकांनी आपली एक कविता व कुसुमाग्रजांची एक कविता सादर केली. यावेळी परीक्षक म्हणून अरविंद ओढेकर, नरेश महाजन, जयश्री पाठक, निशिगंधा घाणेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेत लहान गटात पेठे विद्यालयाचा अथर्वकुमार कुलकर्णी, सेंट फिलोमिनाची सानिका खरे, रचना विद्यालयाची ज्ञानदा कुलकर्णी व उत्तेजनार्थ म्हणून देवश्री सोमवंशी, समृद्धी शुक्ल, श्रद्धा कुलकर्णी, शेख तौफीक, धनश्री आहेर विजेते ठरले. मोठय़ा गटात सारडा कन्या विद्यालयाची वेदांगी पंढरपूरकर, माधवराव बोरस्ते विद्यालयाची पूर्वा क्षीरसागर, डे केअर सेंटरची ॠतुजा जोशी विजेत्या ठरल्या. उत्तेजनार्थ म्हणून साकिना शाह, आकाश चव्हाण, रेवती जोशी, चंद्रकला पाटील, आरीफ खाटीक यांना सन्मानित करण्यात आले.

Story img Loader