अलिबाग : Accident Near Khopoli मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी आहेत. त्यांच्यावर कामोठेतील ‘एमजीएम’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील गोरेगावमधील बाजीप्रभू झांज पथक खासगी बसने पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील एका समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून रात्री १ च्या सुमारास हे पथक मुंबईकडे परतीच्या प्रवासला निघाले. ही बस पहाटे साडेचारच्या सुमारास बोरघाटात आली असता, एका अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस ३०० फूट दरीत कोसळली. त्यात बसचा चक्काचूर झाला.

ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक
Three dead in car accident on chandrapur nagpur road
चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

दुर्घटनेची माहिती मिळताच, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, यशवंती हायकर्स घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दरीतून जखमी आणि मृतांना बाहेर काढणे आव्हानात्मक होते. शर्तीचे प्रयत्न करून या पथकांनी जखमी आणि मृतांना दरीतून बाहेर काढले. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून, हे सर्वजण मुंबईतील गोरेगाव, मालाड आणि माहीम परिसरातील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबियांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

या दुर्घटनेत गोरेगावच्या एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. सतीश आणि स्वप्नील धुमाळ अशी या त्यांची नावे आहेत. हे दोघे आईसह गोरेगावमध्ये राहत होते. आई घरकाम करून घर चालवते. त्यापैकी सतीश हा युवा सेनेचा कार्यकर्ता होता. अवघ्या २३ वर्षांच्या सतीशने आपल्या मित्रमंडळींना घेऊन दोन वर्षांपूर्वीच हे पथक स्थापन केले होते. या पथकात मुलींचाही समावेश होता. यंदाच्या वर्षी त्याचे पथक शिवजयंती, गुढीपाडवा अशा कार्यक्रमांत सहभागी झाले होते. त्यांना मुंबईबाहेरूनही कार्यक्रमासाठी बोलावले जात होते. शुक्रवारी हे पथक पुण्यामध्ये आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी गेले होते. मृतांमध्ये वीर मांडवकर या १२ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

आंबेनळी दुर्घटनेची पुनरावृत्ती

या अपघातामुळे आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर येथील आंबेनळी घाटात २०१८ मध्ये अशीच दुर्घटना घडली होती. २८ जुलै २०१८ रोजी डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी महाबळेश्वरच्या दिशेने निघाले होते. आंबेनळी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची बस दाभिळजवळ ५०० फूट दरीत कोसळली. यात्त बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला, तर एक जण बचावला होता.

मृतांच्या वारसांना पाच लाख

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. जखमींवरील उपचार शासनामार्फत मोफत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.

मृतांची नावे   

जुही दिपक सावंत, यश सुभाष यादव, विर कमलेश मांडवकर, वैभवी सुनील साबळे, स्वप्नील श्रीधर धुमाळ, सतीश श्रीधर धुमाळ, मनीष राठोड, कृतिक संजय लोहित, राहुल गोठण, हर्षदा परदेशी, अभय विजय साबळे, अनिकेत संजय जगताप आणि बस चालक हरीरतन सोपान यादव यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण मुंबईतील गोरेगाव, मालाड आणि माहिम परीसरातील रहिवाशी आहेत.

Story img Loader