गोवा ते मध्य प्रदेश असा प्रवास करण्यास निघालेला आयशर टेम्पो आंबोली वन खात्याच्या चेक नाक्यावर सापडल्याने दीड कोटीचे आफ्रिकन व इंडियन चंदन आढळून आले. गोवा राज्यात आफ्रिकन चंदन नेमके कोठून व कसे आले. त्याचा शोध लावणे वनखात्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.
आफ्रि कन व इंडियन चंदन सुमारे सात हजार १०१ किलो जप्त करण्यात आले. या चंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दीड कोटी होईल असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आयशर टेम्पो संशयावरून आंबोली वन चेक नाक्यावर तपासला असता तस्करी उघड झाली.
गोवा वन खात्याने पासकाम केलेले हे चंदन मध्य प्रदेशात भरमपूर येथे नेण्यात येत होते. गोवा वनखात्याने पासकामी या चंदनाची किंमत कमी केली असून ते सागवान लाकूड असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे हा सारा प्रकार संशयास्पद ठरला आहे. टेम्पोत पिशव्यात बांधून नेण्यात येणाऱ्या या आफ्रिकन चंदन १७१ ग्रेडचे १३३२ नग म्हणजेच ६७७० किलो तर इंडियन चंदन ११३ नग म्हणजे ३३० किलो वजनाचे होते, असे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गोवा राज्यात आफ्रिकन चंदन कसे आणि कोठून आले. हे महाराष्ट्र राज्याच्या वन विभाग तपासताना मोठे अडथळे निर्माण होणार असल्याने केंद्रीय वन खात्यानेच स्वतंत्रपणे या तस्करीची चौकशी करावी अशी मागणी आहे.
आफ्रिकन व इंडियन चंदन वाहतूक होत असताना त्या टेम्पोचा ड्रायव्हर त्यात सागवान असल्याचे सांगत होता. त्यामुळे या प्रकरणात मोठी तस्करी लपली असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या उद्या एकवारच्या दौऱ्यात या विषयी छेडले जाईल असे सांगण्यात आले.

Story img Loader