जलसंपदा खात्याकडून चांगल्या प्रकारे कामांना चालना मिळत असताना राजकीय हेतूने विरोधक आरोप करीत असतात. जलसंपदा खात्याकडून १९५२ पासून २०१२ पर्यंत विविध धरणे व अन्य कामांसाठी ७१ हजार कोटी खर्च करण्यात आले. आज १० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. धरणे- कालवे यामुळे शेतीच्या क्रांतीचे पर्व चालू झाले. विक्रमी अन्नधान्याची उत्पादने झाली. विरोधक मात्र राजकीय हेतूने प्रेरित होऊन ७५ हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचे सांगत आहेत; परंतु जलसंपदा खात्याकडून १९५२ पासून २०१२ पर्यंत विविध धरणे व अन्य कामांसाठी ७१ हजार कोटी खर्च करण्यात आले. मग ७५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा, असा सवाल जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी कोलाड येथे केला आहे. ४० लाख रु. खर्च करून काळ प्रकल्प विम गृहाच्या इमारतीचे व सुमारे ६० लाख रु. खर्च करून जलसंपदा विभाग हेटावणे कालवा विभाग क्रमांक १ या कार्यालयीन इमारतीच्या नूतनीकरण्याच्या उद्घाटनप्रसंगी जलसंपदामंत्री सुनील तटकरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल तटकरे हे होते, तर या वेळी पमुख पाहुणे म्हणून रोहा पंचायत समिती सभापती अनिता शिर्के, रा.जि.प. सदस्य भाई पाशिलकर, बाबूराव भोनकर, अनिता पवार, सुनीता महाबळे, तानाजी देशमुख, शिवराम िशदे, सदानंद गायकर, दयाराम पवार, प्रीतम पाटील, विठोबा िशदे, जाफरभाई येरुणकर, प्रकाश िशदे आदी मान्यवर उपस्थित होते. १५ डिसेंबरला कालव्याला पाणी सोडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले, तर सुनील तटकरे यांनी या वेळी बोलताना १९६७ साली शंकरराव चव्हाण यांनी डोलवहाळ धरणाचे उद्घाटन केले. हे धरण व्हावे म्हणून माझे पिता दत्ताजीराव तटकरे यांनी फार मोठे प्रयत्न केले होते. एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून संबोधले जात होते; परंतु या सिंचनाच्या योजनेमुळे अधिक धान्य पिकू लागले. परंतु काही शेतकरी वर्गाची दुपिकी भातशेती करण्याची मानसिकता दिसत नाही त्याची खंत लागून राहिली आहे. कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु ७० ते ८० टक्केपाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्या वेळी मुळशी धरणाचे पाणी कोलाड-रोहामार्गे समुद्रात जाऊन मिळायला लागले. त्याचा दत्ताजी तटकरे यांनी विचार करून शेतकरी वर्गाला सिंचनाच्या पाण्यावर दुपिकी शेती करण्याचा दिलासा दिला, त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीच्या बाबतीत सुखी आहेत. या पाण्याचा उपयोग रोहा माणगाव भागातील लोकांना पिण्यासाठी होत आहे; परंतु आर.सी.एफ.,आय.पी.सी.एल. आणि रोह्य़ातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना या पाण्याचा उपयोग होत असल्यामुळे शेतीबरोबर उद्योग व्यवसायाचादेखील सर्वाना फायदा झाल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले, तर डोलवहाळ धरणासाठी जागतिक बँकेचे कर्ज घेऊन कालव्याची दुरुस्ती केल्याचे या वेळी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा