एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटासह ते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रायल देण्याचं आश्वासन दिलं म्हणून मी सत्तेत सहभागी झालो. उद्धव ठाकरेंकडे दिव्यांग मंत्रायलयाचा प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी अडीच वर्षांच्या काळात काहीच निर्णय घेतला नाही. महायुतीबरोबर गेल्याने माझ्या मतदारसंघातील विकास कामं होणार असतील, तर मी तिकडे गेलं पाहिजे, म्हणून मी तिकडे गेलो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू. ते मुख्यमंत्री नसतील तर आम्ही त्यांना तसं सांगून देऊ. तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्ही कायम तुमच्याबरोबर राहतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतुक करत बच्चू कडू पुढे म्हणाले, “ज्या माणसाने मागणी न करता दिव्यांग मंत्रायल दिलं. जेवता जेवता आम्ही फक्त त्यांना आठवण करून दिली आणि त्यानंतर त्यांनी लगेच मुख्य सचिवांना फोन केला. कॅबिनेटमध्ये फाईल आली आणि दिव्यांग मंत्रालय झालं. ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, त्याच्यासाठी देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय उभारलं, हा इतिहास घडला. इतिहासात एक कार्यकर्ता म्हणून माझं नाव घेतलं जातं, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. दिव्यांग मंत्रालयाचे अनेक मंत्री होतील. पण दिव्यांगांच्या मनात बच्चू कडूंचं थेट नाव कोरलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. भिंतीवरचं नावं कोण पाहत बसेल, कार दिव्यांगांच्या मनात बच्चू कडूंचं नाव आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How long will you stay with eknath shinde bachchu kadu reaction mahayuti rmm
Show comments