अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अजित पवार गटाला जवळपास ४०-४१ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार गटाला एकूण १३ आमदारांचा पाठिंबा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ विधानसभा आमदार, ३ विधानपरिषद आमदार आणि ५ खासदार उपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याकडेच विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ अधिक असल्याचं दिसलं आहे.

शरद पवारांना पाठिंबा देणारे विधानसभा आमदार

अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्ता तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार

हेही वाचा- “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी….”, सुप्रिया सुळेंची वडिलांसाठी ‘खास’ कविता

शरद पवारांना पाठिंबा देणारे खासदार

श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा), अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) आणि वंदना चव्हाण (राज्यसभा)

शरद पवारांना पाठिंबा देणारे विधान परिषदेचे आमदार

शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी आणि एकनाथ खडसे</p>

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many mla and mp support sharad pawar meeting in yb chavhan see full list rmm
Show comments