Comparison of BJP and Congress-Ruled States : निर्विवाद बहुमत मिळूनही तब्बल १३ दिवसांनी महायुतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पाच डिसेंबरच्या गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि जनसमुदायाच्या साक्षीने महाराष्ट्राला पाच वर्षांच्या खंडाने लाभलेल्या स्थिर सरकारची मैफल जमली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याद्वारे देशातील आणखी एका बलाढ्य राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री निवडला गेला आहे. देशाच्या राजकारणात भाजपाप्रणित एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरुद्ध काँग्रेसप्रणित इडिया आघाडीत थेट स्पर्धा आहे. देशातील ३१ पैकी ९ राज्यांमध्ये (केंद्रशासित प्रदेशांसह) इंडियाचा मुख्यमंत्री आहे. तर, २१ राज्यांमध्ये भाजप्राप्रणित एनडीएचा मुख्यमंत्री आहे. यापैकी १३ राज्यांध्ये पंतप्रधान मोदींनी नेमलेला भाजपाचा मुख्यमंत्री आहे.

या बातमीद्वारे आपण देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची यादी पाहणार आहोत. यामध्ये कोणत्या राज्यात कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे ते जाणून घेणार आहोत.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”

हे ही वाचा >>> “तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेना नरमली; राऊतांची सारवासारव

देशातील ३१ राज्ये (केंद्रशासित प्रदेशांसह) व मुख्यमंत्र्यांची यादी

क्र.राज्य/केंद्रशासित प्रदेशमुख्यमंत्रीपक्षएनडीए/इंडिया
1आंध्र प्रदेशएन. चंद्राबाबू नायडूतेलुगू देशम पार्टीएनडीए
2अरुणाचल प्रदेशपेमा खांडूभारतीय जनता पार्टीएनडीए
3आसामहिमंता बिस्वा सरमाभारतीय जनता पार्टीएनडीए
4बिहारनितीश कुमारजनता दल (संयुक्त)एनडीए
5छत्तीसगडविष्णू देव साईभारतीय जनता पार्टीएनडीए
6दिल्लीअतिशी मार्लेनाआम आदमी पार्टीइंडिया
7गोवाप्रमोद सावंतभारतीय जनता पार्टीएनडीए
8गुजरातभूपेंद्र पटेलभारतीय जनता पार्टीएनडीए
9हरियाणानायबसिंह सैनीभारतीय जनता पार्टीएनडीए
10हिमाचल प्रदेशसुखविंदर सिंग सुखूकाँग्रेसइंडिया
11जम्मू आणि काश्मीरओमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सइंडिया
12झारखंडहेमंत सोरेनझारखंड मुक्ती मोर्चाइंडिया
13कर्नाटकएस. सिद्धरामय्या</td>काँग्रेसइंडिया
14केरळपिनारायी विजयनमार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीइंडिया
15मध्य प्रदेशमोहन यादवभारतीय जनता पार्टीएनडीए
16महाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसभारतीय जनता पार्टीएनडीए
17मणिपूरएन. बिरेन सिंहभारतीय जनता पार्टीएनडीए
18मेघालयकॉनरॅड संगमानॅशनल पीपल्स पार्टीएनडीए
19मिझोरामपी. यू. लालदुहोमाझोरम पीपल्स मूव्हमेंटतटस्थ
20नागालँडनेफियू रिओनॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीएनडीए
21ओडिशामोहन चरण माझीभारतीय जनता पार्टीएनडीए
22पुद्दुचेरीएन. रंगास्वामीऑल इंडिया एन. आर. काँग्रेस</td>एनडीए
23पंजाबभगवंत मानआम आदमी पार्टीइंडिया
24राजस्थानभजनलाल शर्माभारतीय जनता पार्टीएनडीए
25सिक्कीमप्रेमसिंग तमांगसिक्किम क्रांतीकारी मोर्चाएनडीए
26तामिळनाडूएम. के. स्टॅलिनद्रविड मुन्नेत्र कळघमइंडिया
27तेलंगणाअनुमुला रेवंत रेड्डीकाँग्रेसइंडिया
28त्रिपुरामाणिक साहाभारतीय जनता पार्टीएनडीए
29उत्तर प्रदेशयोगी आदित्यनाथभारतीय जनता पार्टीएनडीए
30उत्तराखंडपुष्कर सिंह धामीभारतीय जनता पार्टीएनडीए
31पश्चिम बंगालममता बॅनर्जीतृणमूल काँग्रेसइंडिया

हे ही वाचा >> “…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”

महाराष्ट्रात महायुतीचा दबदबा

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दमदार विजय मिळवत २३५ जागा जिंकल्या आहेत. हा विजय मिळवताना महायुतीने राज्यभरातून ४९.०६ टक्के मते मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४९ जागा आणि ३५.०३ टक्के मते आली. मतांची टक्केवारी आणि मताधिक्याचे विश्लेषण केल्यानंतर महायुतीने किती मोठा विजय मिळवला हे लक्षात येते. महायुतीने जिंकलेल्या जागांपैकी तब्बल १३८ जागांवर त्यांच्या उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. राज्यात भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७, राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. तर, मविआमधील शिवसेनेने (ठाकरे) २०, काँग्रेसने १६ व राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) केवळ १० जागा जिंकल्या आहेत.

Story img Loader