Comparison of BJP and Congress-Ruled States : निर्विवाद बहुमत मिळूनही तब्बल १३ दिवसांनी महायुतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पाच डिसेंबरच्या गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि जनसमुदायाच्या साक्षीने महाराष्ट्राला पाच वर्षांच्या खंडाने लाभलेल्या स्थिर सरकारची मैफल जमली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याद्वारे देशातील आणखी एका बलाढ्य राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री निवडला गेला आहे. देशाच्या राजकारणात भाजपाप्रणित एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरुद्ध काँग्रेसप्रणित इडिया आघाडीत थेट स्पर्धा आहे. देशातील ३१ पैकी ९ राज्यांमध्ये (केंद्रशासित प्रदेशांसह) इंडियाचा मुख्यमंत्री आहे. तर, २१ राज्यांमध्ये भाजप्राप्रणित एनडीएचा मुख्यमंत्री आहे. यापैकी १३ राज्यांध्ये पंतप्रधान मोदींनी नेमलेला भाजपाचा मुख्यमंत्री आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा