मला मराठा समाजापेक्षा कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांना पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली. तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो वेळ मागितला आहे तो नेमका किती वेळ द्यायचा? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.

मनोज जरांगे पाटील अखेर पाणी पिणार

गावकऱ्यांनी त्यांना मागचे दोन तास पाणी पिण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेणार आहेत. आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज त्यांना उठून उभंही राहता येत नाहीये. मगाशी त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा खाली कोसळले. माझ्यासाठी समाजापेक्षा कुणीही मोठं नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!

मराठा समाजाला सरसकट आरक्षण हवं हीच आमची मागणी

मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवा आणि त्याविषयीचे निर्देश द्या अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांचा फोन काही वेळापूर्वी आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ आम्हाला द्या. त्यावर विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्ही थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही ४० वर्षे थांबलो आहोत. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

१ नोव्हेंबरपासून तिसरा टप्पा

१ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही मराठा समाजाच्या मागणीबाबत आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना बोललात का? याचं उत्तर आलेलं नाही.याचा अर्थच असा होतो की केंद्र सरकारला तुम्ही काहीही सांगितलं नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते तरीही त्यांच्याशी संवाद साधला नाही हा प्रश्न सांगितला नाही मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? क्युरेटिव्ह पिटिशन १३ ऑक्टोबरलाच दाखल झाली आहे. त्यानंतर १६ तारखेला आपण विचारलं होतं. पण पंतप्रधानांना काही माहीत असतं तर पंतप्रधानांनी शिर्डीत उल्लेख केला असता. आमचं आंदोलन शांतेत सुरु आहे. मात्र हे शांततेचं युद्ध सरकारला परवडणार नाही. असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Story img Loader