Saif Ali Khan’s Attacker Arrest : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, त्याने एका ठिकाणी जीपेच्या माध्यमातून व्यवहार केल्याने त्याचा ठावठिकाणा लागला. त्यामुळे ७० तास गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांना पकडता आले, असे वृत्त इंडियन एक्स्प्रसेने दिले आहे.

आरोपीने वरळीतील सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी गुगल पे द्वारे युपीआय व्यवहार केला होता. या व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला. या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन ट्रॅक करून पोलीस ठाण्यातील कामगार वस्तीपर्यंत पोहोचले. कामगार वस्तीत शोधाशोध करूनही तो सापडला नाही. अखेर त्याने थोड्यावेळा करता मोबाईल फोन सुरू केला असता पोलिसांना तो कांदळवनातील जंगलात लपला असल्याचं समजलं. त्यानुसार टॉर्चच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाण्यातील घनदाट जंगलात शोध घेतला. त्याचा मोबाईल नंबर सापडल्यानंतर जवळपास १०० पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच जंगलाच्या झुडुपातून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…

प्राथमिक चौकशीनंतर आरोपीने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बातम्यांमध्ये माझा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मी घाबरलो होतो. त्यामुळे मी ठाण्यातील ज्या बारमध्ये काम करत होतो तिथे गेलो. ठाण्यातील परिसर माझ्या परिचयाचा होता.”

पोलीस माग काढत वरळीपर्यंत कसे पोहोचले

सैफवर हल्ला झाल्याचं समजताच मुंबई गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजनुसार तो आधी वांद्रे रेल्वे स्थानकात गेला, तिथून तो दादर येथे उतरला. दादरच्या एका दुकानातून त्याने मोबाईल कव्हरही खरेदी केले. पण त्याने इथं रोख रक्कम भरली. तिथून तो कबूतरखाना आणि नंतर वरळीला गेला. असं सीसीटीव्हीतून पोलिसांना समजलं, अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

वरळी परिसरातील फुटेज तपासल्यानंतर तो सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर काही काळ रेंगाळत असल्याचं दिसले. फुटेजमध्ये तो स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारतानाही दिसला. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ वरळीत धाव घेऊन त्या स्टॉल मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून काहीतरी पुरावा मिळेल, या आशेने पोलिसांनी तिथे सात पथके तैनात केली.

स्टॉलचा मालक नवीन एक्का या नावाने ओळखला जातो. पोलिसांना या एक्काचा जनता कॉलनीतील जयहिंद मित्र मंडळ येथील घराचा पत्ता सापडला. ते तिथे पोहोचले असता तो तिथे सापडला नाही. एक्का तिथे पाच-सहा कामगारांसह भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथील खोली मालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. एक्का नावाचा भाडेकरू तिथे राहत असल्याचं मालकाने सांगितलं, पण ते आरोपीला ओळखू शकले नाहीत, असंही इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद आहे.

खोली मालकाच्या मुलाने एक्काचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. त्यानुसार, पोलिसांनी एक्काला फोन करून त्याची चौकशी केली. या चौकशीतून त्याने सांगितलं की मोहम्मदने पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी युपीआय पेमेंट केले होते. त्या पेमेंटमुळे पोलिसांना मोहम्मदचा मोबाईल नंबर मिळाला.

…अन् आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना आलं यश

दरम्यान, ठाण्यातील कासारवडवली येथे अमित पांडे नावाच्या कंत्राटदाराने त्याला काही महिन्यांपूर्वीच कामावर ठेवले होते. त्याचा मोबाईल नंबर पोलिसांसाठी टर्निंग पाँइट ठरला. जवळपास २० पथके ठाण्यात पोहोचली आणि संशयिताचा शोध सुरू केला. परंतु, तो घटनास्थळावरून पळून गेला आणि शनिवारी रात्री १० च्या सुमारास त्याने आपला मोबाइलही बंद केला. परंतु, थोड्यावेळाने तो ठाण्यातील जंगलात लपल्याची माहिती मिळाली. डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाला तो एका झुडप्याखाली लपल्याचं दिसलं. त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

Story img Loader