आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पक्षबांधणी जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि युती अशी दुहेरी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याबाबतची उत्सुकता नेतेमंडळींसह सामान्य नागरिकालाही आहे. दरम्यान, निवडणुकीची ही प्रक्रिया पाहता, एखाद्या तरुणाला आता आमदार व्हायची इच्छा असेल तर त्याच्याकडे कोणतं कौशल्य हवं? असा प्रश्न राजकारणाची आवड असलेल्या प्रत्येकाला पडत असतो. या प्रश्नाचं सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) तरुण आमदार रोहित पवार यांनी दिलं आहे. खास रे टीव्ही या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> अजितदादांनी फॅमिली What’s App Group सोडला आहे का? रोहित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले….

एखाद्या पोराला आमदार व्हायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? असा प्रश्न रोहित पवार यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवार म्हणाले की, एकतर त्याला राजकीय पार्श्वभूीमी असली पाहिजे. तुम्ही कोणत्याही संघटनेत काम केलेलं असावं. नाहीतर सामाजिक क्षेत्रात तुमचा लोकांसोबतचा संपर्क चांगला पाहिजे.

नुसती स्वप्न पाहू नका

“स्वतःवर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. निवडणूक का लढतोय हे क्लिअर पाहिजे. काही वेळेस पॉवर पाहून लोकांना वाटतं की मला राजकारणात जायचंय असं होतं. परंतु, नुसती स्वप्न पाहून चालत नाही. लोकांमध्ये जावं लागतं”, असं रोहित पवार म्हणाले.

“नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समिती (निवडून येणं), कोणालातरी निवडणून आणण्यासाठी मदत केली असली पाहिजे. तुमचा संपर्क चांगला असला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचा रोल पक्षाचा असतो. तुम्ही का राजकारणात येताय याचं उत्तर जाणून घ्या”, असंही ते पुढे म्हणाले.

घरच्यांना विश्वासात घ्या

“तुमचं लग्न झालं असेल तर पत्नीला विश्वासात घ्या, महिला (उमेदवार) असाल तर पतीला विश्वासात घ्या. आई वडिलांना विश्वासात घ्या. नाहीतर घर आहे अडचणीत तुम्ही आहात राजकारणात असं होऊ देऊ नका. आपली जबाबजदारी कुटुंबाच्या प्रती पहिली. नाहीतर लोकच म्हणतील घराला वाऱ्यावर सोडलं आहे, आपलं काय करणार?”, असंही पवार म्हणाले.