वाई : तुमची लोकप्रियता आणि एवढं जनतेचं प्रेम असताना तुम्ही लोकसभेला कसे पराभूत झाला. जिथं मी केलेल्या कामांवर निवडून येतो आणि तुम्ही लोकांचं प्रेम असताना निवडणुकीत पराभूत होता याचं आत्मचिंतन करा असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साताऱ्यात भित्ती चित्रावरून खासदार आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यात निर्माण झालेला वाद हा बालिशपणाच आहे. शहरातील आणि मतदारसंघातील वातावरण तणाव पूर्ण होऊ नये याची काळजी लोकप्रतिनिधींनी घ्यायची असते. त्यांचं भित्तिचित्र  त्रयस्थांनी काढलं असतं तर समजणं शक्य होतं. पण, त्यांच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी पालिकेची उमेदवारी मिळविण्यासाठी भीतीचित्र काढायचं आणि लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदोउदो करायचा हे काही खरं नाही.

हेही वाचा >>> सांगली : पालकमंत्री सुरेश खाडेंकडून रिक्षाचे सारथ्य

खासदार उदयनराजे यांच्या भित्तीचित्रावरून राजे समर्थक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये गैरसमजातून वाद निर्माण झाला होता. उदयनराजेंशी हा वाद नव्हता केवळ गैरसमज झाला होता असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तुम्हीही लोकांची कामं करा, लोक तुमचेही भित्तिचित्र काढतील असा सल्ला दिला होता. त्यावर आज शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> कसबा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच पुण्यात; प्रतिक्रिया देताना म्हणाले “आता आम्ही पोस्टमार्टम..”

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालायला हवा. प्रशासनाला त्यांची दैनंदिन कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावं लागेल असं कोणतंही कृत्य करू नये. खासदारांच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांच भित्तिचित्र काढायचं आणि मी कसा लोकप्रिय आहे याचा त्यांनी उदोउदो करायचा हे न समजण्याच्या पलीकडं आहे. लोकांच्या विकासकामांना महत्त्व देणं अतिशय गरजेचं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the lok sabha was defeated shivendra raje taunt to udayanraje ysh
Show comments