गारपीट झाली, मोठे नुकसान झाले. हवालदिल या शब्दाचा अर्थ गारपिटीने अनेकांनी अक्षरश: अनुभवला. बळीराम विठोबा काटकर यांचा मुलगा नितीन कोणी तरी येईल, आपल्या नुकसानीची पाहणी करेल, या विवंचनेत दिवसभर शेतात थांबला. त्या दिवशी केंद्राचे पथक जिल्ह्य़ात येणार होते. आपल्याही शेतात पाहणी होईल, म्हणून तो ताटकळत उभा होता, पण कोणी आलंच नाही..
काटकर कुटुंबात तिघे भाऊ. एकूण १० एकर जमीन. एका एकरावर िलबाची बाग. तीन एकरावर कापूस, अडीच एकरात हरभरा व एक एकर गव्हाचे पीक होते. गारपिटीने िलबाची बाग उन्मळून पडली. आता घरी नेण्यासारखे काहीच उरले नाही. होते नव्हते, सर्व मातीत मिसळले. िलबाच्या बागेतून उन्हाळ्यात सुमारे ३ लाखांचे उत्पन्न झाले असते. त्यावर घरात गहू, हरभरा, व कापसाचे पीक कर्जफेडीचा व्यवहार अवलंबून होता. गहू, हरभरा तर गेला. आता घरात खायलाही अन्न नाही. केवळ १० िक्वटल कापूस कसाबसा घरात आला होता. आता बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा मोठा प्रश्न आहे, असं सांगताना नितीनचे डोळे डबडबले..  भूविकास बँकेचे विहीर खोदण्यासाठी घेतलेले २३ हजारांचे कर्ज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बोजा ४० हजारांचा. सांगा, कसं जगायचं?.. त्यानं मान फिरवली, आणि शर्टाच्या बाहीनं डोळे पुसले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा