सांगली : बारावी परीक्षा सुरू होण्याच्या पूर्व संध्येला मिरजेतील भारतनगरमध्ये एका बारावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

भारतनगरमधील गवळी प्लॉटमध्ये वास्तव्य असलेल्या प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो खासगी अकादमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी रात्री परीक्षेची पूर्व तयारी कशी करायची, पेपर कसा सोडवायचा याबाबतचे अकादमीमध्ये मार्गदर्शन घेउन घरी आला होता. रात्री बहिणीशी नेहमीप्रमाणे चर्चा करून तो वरच्या मजल्यावर गेला. रात्री नउ वाजणेच्या सुमारास त्याला जेवणासाठी बोलावण्यास वरच्या मजल्यावर गेल्यानंतर त्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. बारावी परीक्षेच्या तणावातून त्यांने आत्महत्या केली की अन्य कारण आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.

Story img Loader