मराठी साहित्य ‘व्यवहारा’त कोटय़वधींचा चुराडा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येक गोष्टीत सढळ हाताने केलेला खर्च, महत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ साहित्यिकांची सरबराई, त्यांची आलिशान व्यवस्था, डोळे दिपवून टाकणारा झगमगाट, ‘डीपीयू’ (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी) या इंग्रजी अक्षरांनी रसिकांचे मराठी साहित्य संमेलनात होणारे स्वागत आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी कोणतीच कसर न ठेवता वाटलेला रमणा अशा ‘अर्थवैशिष्टय़ां’सह पिंपरीतील बहुचíचत साहित्य संमेलनाची शुक्रवारी सुरुवात झाली. त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसांत आणखी काय-काय पहायला मिळेल, याचे आडाखे साहित्य रसिक बांधत असून संमेलनासाठी करण्यात आलेल्या कोटय़वधींच्या खर्चाची आणि भव्यतेचीच चर्चा संमेलनात सर्वत्र सुरू झाली आहे.
संमेलनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत आयोजकांची श्रीमंती दिसून येत आहे. संमेलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर जाहिरात फलक तसेच मोठमोठे होìडग लागलेले आहेत. संमेलननगरीच्या प्रवेशद्वाराजवळ संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भव्य प्रतिकृती तर संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून जवळपास ८० फूट लांब व पाच फूट जाडीच्या फाऊन्टन पेनची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
या संमेलनसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची यजमान संस्था म्हणून निवड झाली, तेव्हाच महामंडळाच्या इतिहासात हे सर्वाधिक खíचक संमेलन होणार, याची नांदी झाली होती. त्याची अनुभूती शुक्रवारी पहिल्याच दिवशी आली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी दहा वाजता साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. ज्येष्ठ कवी गुलजार, जावेद अख्तर यांच्यासह ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आणि ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले रजनी अशा कार्यक्रमांना गर्दी होणार हे नक्की असले तरी त्यासाठी किती खर्च आला याची कुजबुज सुरू आहे. संबंधित : पान ७
झगमगाट आणि लखलखाट..
- एकूण मदानात रंगीबिरंगी अशा तब्बल १२०० दिव्यांचा डोळे दिपविणारा झगमगाट.
- मुख्य मंडपात १२० फुटी भव्य व्यासपीठ असून त्यावरही २०० हून अधिक एलईडी दिवे.
- सर्व मंडपभर १३ एलईडी स्क्रीन.
- अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी आलिशान व्यवस्था मुख्य मंडपालगतच.
- प्रवेशद्वारापासून प्रत्येक मंडपात जाण्यासाठीच्या विविध मार्गावर अनेक रंगांचे गालिचे अंथरण्यात आले आहेत.
- मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना खासगी २०० सुरक्षारक्षक (बाऊन्सर) तनात.
- वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे जनरेटरची व्यवस्था.
- पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरचा भरमसाठ साठा.
- संमेलनाला येण्यासाठी स्वतंत्र बसव्यवस्था.
दौलतजादा..
विद्यमान, मागील वर्षीचे तसेच अंदमान येथील संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर सर्व हयात माजी संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधीही पाटील यांनी जाहीर केला आहे.