सातारा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ कराडमधून काढण्यात आलेल्या रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कन्याशाळेसमोरील वि. दा. सावरकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत पुरुषोत्तम जाधव व युवा नगरसेवक विक्रम पावसकर यांना खांद्यावर घेऊन तरुणाईने एकच जल्लोष केला.
हिंदू एकताचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर, विक्रम पावसकर, प्रमोद तोडकर, रूपेश मुळे, रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे, विठ्ठल पाटील, विनायक भोसले, विकास पाटील उपस्थित होते. बाजारपेठेतून रॅली आझाद चौकमार्गे दत्त चौकात नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले. या वेळी विक्रम पावसकर यांनी पुरुषोत्तम जाधवांना सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि ग्रामीण भाागतील प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.
पुरुषोत्तम जाधवांच्या रॅलीला कराडात प्रतिसाद
सातारा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ कराडमधून काढण्यात आलेल्या रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कन्याशाळेसमोरील वि. दा. सावरकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला.
First published on: 15-04-2014 at 03:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to purushottam jadhav rally in karad