सातारा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ कराडमधून काढण्यात आलेल्या रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कन्याशाळेसमोरील वि. दा. सावरकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत पुरुषोत्तम जाधव व युवा नगरसेवक विक्रम पावसकर यांना खांद्यावर घेऊन तरुणाईने एकच जल्लोष केला.
हिंदू एकताचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर, विक्रम पावसकर, प्रमोद तोडकर, रूपेश मुळे, रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे, विठ्ठल पाटील, विनायक भोसले, विकास पाटील उपस्थित होते. बाजारपेठेतून रॅली आझाद चौकमार्गे दत्त चौकात नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले. या वेळी विक्रम पावसकर यांनी पुरुषोत्तम जाधवांना सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि ग्रामीण भाागतील प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा