सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – आचराची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करून आचरे गावचे नाव लौकिक केले आहे. ‌आचरे काझीवाडीच्या हुमेरा काझीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IPL 2023 : विजयी प्रारंभाचे मुंबईचे लक्ष्य ; रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध पहिला सामना आज; रोहित, कोहलीकडे नजर

हेही वाचा – माद्रिद मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा : सिंधू हंगामातील पहिल्या अंतिम फेरीत, सिंगापूरच्या येओ जिया मिनवर संघर्षपूर्ण विजय

हुमेराला गावची ओढ पहिल्यापासूनच होती. तिसरीमध्ये असल्यापासूनच तिला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती. गावी आल्यावर मोठ्या संघाबरोबर खेळूनही ती जिंकत होती. ऑल राउंडर म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली होती. याबाबत तिच्याशी फोनवरून संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६ वर्षांखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत १९ वर्षांखालील संघात सुरुवातीला तिची सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती. खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून संघात स्थान निर्माण केले. त्यानंतर २३ वर्षांखालील संघातून खेळत तिने वरिष्ठ संघात स्थान निर्माण केले. महिला भारतीय संघात दोनवेळा चॅलेंजरमधून खेळल्याचे तिने सांगितले. हुमेराच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्समध्ये संधी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humaira kazi from malvan achra in sindhudurg district has played well for mumbai in the wpl