वाशीम : शुक्रवार २१ जुलै च्या रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. आज २२ जुलै रोजी सकाळ पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने जिल्हा चिंब झाला असून ६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके धोक्यात आली असून जन जीवन विस्कळीत झाले आहे.

मृग नक्षत्र कोरडाच गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोर धरला. गत तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवार २१ जुलै रोजी रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. २२ जुलै रोजी सकाळ पासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होत आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केल्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होत असून पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?

हेही वाचा >>>विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस; भंडारा, गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, २७ जखमी

जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत असून कारंजा, मानोरा, मालेगाव व रिसोड तालुक्यात पाऊस झाल्याची माहिती आहे. वाशीम तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा >>>गडचिरोलीत सर्वदूर मुसळधार; २३ मार्ग बंद, शाळांना सुट्टी

कारंज्यासह काही भागात अतिवृष्टी !

कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. नद्या, नाल्याना पूर आले. नद्यातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शेतात पाणी घुसले. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके खरडून गेली तर अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे.

Story img Loader