वेगवान वाहनधारकांसाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, वेगवान वाहनांच्या धडकेत एखादा मनुष्यप्राणी प्राणाला मुकला आणि त्याला मदत न मिळता त्याच्या देहावरून शेकडो वाहनांचा प्रवास तसाच होत असेल तर माणुसकीलाही शरम वाटावी अशा वेगाचा काय उपयोग असा प्रश्‍न मनात येतो. अशीच एक ह्दयद्रावक घटना नव्याने होत असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर रविवारी मध्यरात्री घडली आहे. महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंगावर शेकडो वाहने गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेगवान वाहनांनी चिरडल्यामुळे पार्थिवाचे तुकडे पोत्यात भरण्याची वेळ पोलिसांवर आली होती.

हेही वाचा- “…तर तू फक्त आमदारच राहशील”; राजकारणात येण्यापूर्वीच शरद पवारांनी रोहित पवारांना केलं होतं सावध, ‘तो’ सल्ला आजही ठरतोय कानमंत्र!

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

याबाबत माहिती अशी की, एक अज्ञात व्यक्ती रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील मिरजेजवळील निलजी-बामणी गावच्या हद्दीमध्ये काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्त्यावर पडली. वाहनाची धडक बसलेली व्यक्ती तशीच रस्त्यावर पडून राहिली असताना त्या व्यक्तीच्या देहावरून शेकडो वेगवान वाहने तशीच पुढे गेली. यामुळे या पार्थिवाचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. ही माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन या पार्थिवाचे महामार्गावर विखुरलेले तुकडे गोळा करीत पोत्यात भरले आणि पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडला.

हेही वाचा- VIDEO: “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, कारण…”, शाईफेक प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

अद्याप या व्यक्तीची ओळखही पटू शकली नाही. यामुळे अज्ञात व्यक्तीचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू एवढी नोंद सरकारी कागदपत्रावर झाली. मृत व्यक्ती बेघर असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली असली तरी ओळख मात्र अद्याप पटविण्यात अद्याप पोलिसांना  यश आलेले नाही.

Story img Loader