Husain Dalwai on Mahant Ramgiri maharaj: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी आक्षेप घेतला आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या विधानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अप्रत्यक्ष समर्थन होत आहे का? असा प्रश्न सोलापूर येथील पत्रकार परिषदेत दलवाई यांना विचारण्यात आला होता. यावेळी दलवाई म्हणाले, महंत रामगिरी महाराजांना अटक झाली पाहीजे. उद्या कुणी रामाबद्दल बोलले तर चालेल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना हुसेन दलवाई म्हणाले की, महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे. आपल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. मुख्यमंत्री जर अशा प्रवृत्तीला समर्थन देत असतील तर मुख्यमंत्र्यांना हटवले गेले पाहीजे, अशी मागणी दलवाई यांनी केली.

Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हे वाचा >> पुणे: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांनी डोकं चालवून काम करावे

हुसेन दलवाई पुढे म्हणाले, राज्यात असा मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोके चालवून काम करावे, अशीही टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, या मागणीसाठी दलवाई राज्यभर दौरा करत आहेत.

सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानतर्फेसिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात प्रवचन देत असताना संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्या प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader