दापोली: तालुक्यातील रुपनगर येथील एका सदनिकेमध्ये सिलेंडर स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले.  त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील रूपनगर परिसरात शिर्के कुटुंबीय राहतात. शुक्रवार दुपारी ३ वाजता सुमारास त्यांच्या घरातील सिलेंडरने अचानक पेट घेतला. झालेल्या स्फोटात आतील सामानाची अक्षरशः राखरांगोळी झाली. स्फोटाचा आवाज व घरात लागलेली आग यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूची भिंत समोर असलेल्या माने यांच्या दरवाजावर पडली तसेच शेजारील जाधव यांच्या घरालाही झालेल्या स्फोटाचा हादरा बसला.

हेही वाचा >>>Rajan Salvi : “योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

दुपारची वेळ असल्याने घरी केवळ पती-पत्नीच होती सुदैवाने त्यांची मुले शाळेत गेली होती. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र त्यांच्या घरातील साहित्य तसेच घरगुती वापराच्या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यांच्या घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून खाली पडली. यामुळे सदनिकेखाली उभ्या असलेल्या चार चाकीचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या स्फोटामध्ये अविनाश शिर्के व आश्विनी शिर्के हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यांना आता पुढील उपचारासाठी तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and wife seriously injured in cylinder explosion in dapoli news amy