परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (१० जानेवारी) समोर आलाय. ही घटना पालम तालुक्यातील पुयणी येथे घडली. रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय ४५), सविता रंगनाथ शिंदे (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.
शिंदे दाम्पत्याला दोन मुले असून त्यांची सुमारे ५ एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीवर सततची नापिकी, दुबार पेरणीचे संकट यायचे. यामुळे शिंदे यांच्या हाती फारसे उत्पन्न येत नव्हते.
हेही वाचा : हिंगोलीत एकाच झाडाला गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या
याही हंगामात सोयाबीन व तूर हातचे गेल्यानंतर शिंदे यांनी नैराश्याच्या मानसिकतेतून रविवारी रात्री पत्नी सविता हिचा ती गाढ झोपेत असताना गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर पतीने स्वतः छताला गळफास लावून स्वतःचीही जीवनयात्रा संपविली.