सोलापूर : आसपासच्या ओळखीच्या व्यक्तींना एकत्र करून सुरू केलेल्या भिशीचा व्यवहार आर्थिकदृष्ट्या अंगलट आल्यामुळे आणि त्यातूनच कर्ज झाल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा खून केला आणि मुलावरही प्राणघातक हल्ला केल्याची घटना बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथे घडली. मनीषा अनंत साळुंखे (वय ४४, रा. जावळे प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा तेजस (वय २१) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मृत मनीषा हिचा पती अनंत रामचंद्र साळुंखे याचे नाव संशयित आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.

मृत मनीषा हिने आसपासच्या ओळखीच्या व्यक्तींना एकत्र करून भिशी सुरू केली होती. परंतु, त्यात आर्थिक नुकसान झाल्याने भिशीची रक्कम भागविण्यासाठी तिने कर्ज करून ठेवले होते. तरीही भिशीची रक्कम न मिळालेले काही लोक साळुंखे यांच्या घरी येऊन दमदाटी करीत होते. भिशीचे पैसे न दिल्यास आम्ही घरातील सामान घेऊन जाऊ, तुमच्या घराला कुलूप लावू, अशा धमक्या वाढल्यामुळे अनंत साळुंखे हा पत्नी मनीषा हिच्यावर रागावला होता. एकीकडे भिशी लावलेल्या व्यक्तींना भिशीची रक्कम अदा करणे अशक्य झाले असताना दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने संतापलेल्या अनंत साळुंखे याने पत्नी मनीषा हिचा खून करण्याचा डाव रचला. त्याने तिला पुण्याला जायचे आहे, अशी थाप मारून पत्नी मनीषा आणि मुलगा तेजस या दोघांना दुचाकीवर बसवून प्रथम आपल्या शेतात नेले. तेथे गेल्यानंतर त्याने अचानकपणे मनीषा हिचा गळा टॉवेलने आवळला आणि मानेवर, जबड्यावर चाकूने प्रहार केला. नंतर तोंडावर दगडाने मारले. हा प्रकार पाहून भीतीने थरकाप उडालेल्या, मुलगा तेजस याच्याकडे त्याने मोर्चा वळवून त्यासही चाकूने भोसकले. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Parbhani crime news
Parbhani Horror: तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीनं पत्नीला जिवंत जाळलं; पेटलेल्या शरीरानं ती पळत राहिली पण…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Three Bangladeshis arrested for illegally staying near Solapur
सोलापूरजवळ बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक
Thieves break into house in Solapur and steal crime news
परगावी जाणे आले अंगलट; ८.५७ लाखांचा ऐवज लंपास
Pankaja Munde on prajakta Munde
Pankaja Munde : “पवित्र प्राजक्ताची फुलं सांडताना…”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप!
Uttam Jankar on Ajit Pawar
Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं
Deepali Sayed and prajakta mali
Deepali Sayed : “करुणा मुंडेंने नाव घेतलं तेव्हाच…”, प्राजक्ता माळीप्रकरणावर दीपाली सय्यद यांनी मांडली भूमिका!
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
Story img Loader