सांगली: मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे अशा शब्दात राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

सांगली दौर्‍यावर आलेल्या केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली फलकबाजी हास्यास्पद असून मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, मात्र, त्यासाठी आपली ताकद असेल तरच हे शक्य आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

आणखी वाचा- “ही तर राक्षसी राजवट…” बारसूतील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी व्यक्त केला संताप

सद्यस्थितीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना त्यांच्या गटातून संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हालाही त्यांची आवश्यकता नाही. अजितदादा व सुप्रियाताई यांच्यात सध्या चढाओढ सुरू आहे. मात्र, जोपर्यंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत अन्य कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. त्यांनी आता ठोस निर्णय घेउन एनडीएसोबत यायला हवे. ते जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. मी आता एनडीएसोबत आहे, मग पवार यांनीही यायला हरकत कसली? त्यांनीच आता ठोस भूमिका घ्यावी.

उद्धव ठाकरे आपले मित्र आहेत, तसेच ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४०आमदारांवर होत असलेली जहरी टीका अमान्य आहे. त्यांनी बोलताना भान ठेवून बोलण्याची गरज आहे असे मतही त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर व्यक्त केले.

Story img Loader