महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी सपत्नीक शिर्डीमध्ये साईबाबा समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भाजपाचे खासदार सुजय विखे-पाटील त्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. यावरती सुजय विखे-पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

सुजय विखे-पाटील म्हणाले, “राज ठाकरेंच्या वकृत्व आणि भाषणशैलीचा प्रभाव माझ्या राजकीय जीवनावर राहिला आहे. यामुळे व्यक्तीगत पक्षविहरीत राज ठाकरेंचा मोठा चाहता आहे. माझी कधी त्यांच्याबरोबर भेट झाली नाही. माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत. त्यामुळे सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे, यात कोणतेही राजकारण नाही,” असेही विखे-पाटील यांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – अजित पवार पुन्हा भाजपासोबत जाणार का? प्रश्न विचारताच शहाजीबापू म्हणाले, “ते कधी काय करतील…”!

दरम्यान, राज ठाकरे एक आणि दोन ऑक्टोबर असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकला जाण्यापूर्वी शिर्डी विमानस्थळावर खाजगी विमानाने त्यांचे आगमन झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह साईबाबा समाधी दर्शन घेतलं. यावेळी ‘साईबाबांनी आम्हाला खूप काही दिलं आहे,’ असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader