विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. अनेक विषयांवर अमृता या ट्विटरच्या माध्यमातून आपली मत मांडत असतात. यावरुन अनेकदा त्या राजकीय भाष्य करतानाही दिसतात. अगदी राष्ट्रीय विषय असो किंवा राज्यातील अमृता फडणवीस या ट्विटवरुन अऩेकदा राजकीय मतप्रदर्शन करताना दिसतात. याचाच संदर्भ घेऊन एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना राजकारणामधील प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी आपण राजकारणामध्ये येण्यासाठी अनफीट म्हणजेच अयोग्य असल्याचं सांगितलं. मात्र आपण राजकारणासाठी योग्य का नाहीत या मागील कारणही त्यांनी यावेळी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> अमृता फडणवीस म्हणतात, मी योग्य मुद्दा सापडल्यावरच बोलते आणि शिवसेनावाले…

अमृता फडणवीस आम्हाला भविष्यात राजकारणात दिसतील का?, असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये अमृता यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी ट्रोलिंगपासूनच सुरुवात केली. “राजकारणात नसतानाही एवढं ट्रोलिंग होतं आणि मला जे बोलायचंय ते मी बोलते. राजकारणात जाईन तर कशी हालत होईल माझी. मला वाटतं मी सरळ बोलते. मला कोणाची भीती नाहीय. मी माझ्या हिशोबानेच काम करु शकते. त्यामुळे मी राजकारणासाठी अनफिट आहे,” असं उत्तर अमृता यांनी  ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात… 

शिवेसेनेसंदर्भातील प्रश्नावर म्हणाल्या…

अनेकदा तुमच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका होते. शिवसेनेला शवसेना म्हणणं असो किंवा आदित्य ठाकरेंबरोबर रंगलेलं ट्विटवॉर असो किंवा प्रियंका चतुर्वेदींसोबत रंगलेलं ट्विटवॉर असो एका मित्र असलेल्या पक्षाबरोबर आता जे बदलेलं नातं आहे त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न अमृता यांना ‘मुंबई तक’च्या विशेष मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता या अनेकदा राज्यातील सत्ताधारी पक्ष, मुंबईतील प्रश्न यासंदर्भात ट्विटवरुन व्यक्त होत असतात. याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी, “खूप वेळा असं होतं की नाती बदलतात. अशावेळी आपण ज्या कुरुक्षेत्रात आहोत, ज्या बाजूने आहोत त्या बाजूने आपण बोलतो. तिथे आपली बाजू मांडण्यासाठी आहे, काहीतरी बोलण्यासारखा विषय आहे असं वाटल्यास मी ही बोलते,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच!”

पुढे बोलताना, “साहाजिकपणे आता आम्ही (भाजपा आणि शिवसेना) एकमेकांच्या विरोधात आहोत तर ते ही माझी काही स्तृती नाही करणार. त्यामुळे मला जेव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार. फरक इतकाच आहे की मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.” असं मत अमृता यांनी मांडलं.