मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरुन सुरु असलेला वाद आता टोकाला पोहचला आहे. शिवसेना नेमकी कुणाची? याबाबतच फैसला आता सुप्रीम कोर्टातच होईल. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकारणावरुन मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा- टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?
अमित ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
“सध्याच राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का? या प्रश्नावर त्यांनी मी जर तर मी देखील राजकारणात आलोच नसतो”, असं थेट उत्तर दिलं आहे. सध्या अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्ष बाधंणीसाठी ते राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. नुकताच त्यांनी कोकण दौरा केला असून सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगावमधील विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे. राज ठाकरेंसोबत काम करण्यासाठी अनेक युवा उत्सुक असल्याचे या दौऱ्यादरम्यान दिसून येत आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् नांदेडमध्ये शिवसेनेला खिंडार
दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढण्याची शक्यता
या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत करणार का? या प्रश्नावर मात्र अमित ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील आणि त्यांच्या मताशी मी सहमत असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनसे आणि भाजपाची वाढती जवळिकीचाही अगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचेही परिणाम दिसून येऊ शकतात.