मी कोणतीही चूक केलेली नाही. आपल्याकडे कोणी राजीनामा मागितला नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे माध्यमांना सांगितले. उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असून दुष्काळाची पाहणी करणाऱ्या केंद्रिय पथकाच्या दौऱ्यात आपण सामील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध आरोपांच्या पाश्र्वभूमिवर मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित न राहता आणि लाल दिव्याच्या गाडीचा वापर न करता मंगळवारपासून येथे आलेल्या खडसे यांना त्यांचे समर्थक येऊन भेटत आहेत. पक्षश्रेष्ठींना काही दोषी आढळले तर त्यांचा निर्णय आपणास मान्य राहिल. शेवटी मी भाजपचा कार्यकर्ता आगे असे खडसे यांनी नमूद केले. नेत्यास गोत्यात आणण्यासाठी विरोधकांकडून षडयंत्र रचले जात असल्याचे भाजपमधील खडसे समर्थकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात येथे खडसे यांच्या बंगल्यावर आलेले शहाद्याचे आमदार उदयसिंग पाडवी यांनी खडसे एक सक्षम मंत्री असून त्यामुळे मित्र पक्षांना देखील त्यांच्याबद्दल पोटदुखी असल्याचा आरोप केला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदार खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे त्यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा