महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जातेय. त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही टीका केली आहे. महात्मा गांधींना अख्ख जग नमन करतं, त्यामुळे अशा स्वरुपाचा आरोप सहन केला जाणार नाही. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

छगन भुजबळ म्हणाले की,” मनोहर भिडेंवर आम्ही सुद्धआ एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खालल्यानंतर मुलगा होईल, या वक्तव्याप्रकरणी केस झाली होती. कोर्टात ती केस ढकलली जात आहे. ज्या पद्धतीने महात्मा फुलेंवर टीका करतात, तसंच आता महात्मा गांधींवरही टीका करतात. माझी खात्री आहे की पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनाही हे आवडणार नाही.

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Narendra Modi
Narendra Modi : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Ekta kapoor on The Sabarmati Report release amid maharashtra assembly election
“मी हिंदू आहे, याचा अर्थ मी…”; एकता कपूर नेमकं काय म्हणाली?

हेही वाचा >> संभाजी भिडेंवर ‘या’ कलमांनुसार कारवाई होऊ शकते, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“महात्मा गांधींना अख्ख जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलोय, असा क्वचित एखादा देश असेल जिथे महात्मा गांधीचा पुतळा नाही. महात्मा गांधींच्या विचारसणीला मानलं जातं, आपलंसं केलं जातं. त्या महात्मा गांधींवर किती गलिच्छ स्वरुपाची टीका करतात, त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे. त्यांच्यासोबत जाणं हे राजकारणाच्यादृष्टीनेही आत्मघातकी आहे. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातीलच नाहीतर, गुजरातमधील कोणताच बांधव-भगिनी सहन करील का? म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवनवीन बोलतात”, असंही छगन भुजबळ म्हणाले.

संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

संभाजी भिडे, निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्‍या इतर आयोजकांच्‍या विरोधात पोलिसांनी भादंवि १५३ (३), ५००, ५०५(२), ३४ कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महापुरूषांविषयी वादग्रस्‍त विधान करून लोकांमध्‍ये असंतोष पसरविणे, विविध समाज घटकांमध्‍ये वाद वाढविणारे भाष्‍य करणे आणि महापुरूषांची बदनामी करणे, याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >> “तुमच्यासारख्या अर्ध्या रात्री बैठका घेतल्या नाहीत”, ठाकरेंच्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर; म्हणाले “तुमच्यावर चारचौघात…”

संभाजी भिडेंच्या कोणत्या विधानावरून वाद?

संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं आहे. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले होते.