महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. गल्लीतील स्थानिक नेते ते दिल्लीतील बडे नेते यात सहभागी झाले आहेत. प्रचारसभांमध्ये या नेत्यांनी जनतेशी निगडीत महत्त्वाच्या मुद्दांना हात घालणे अपेक्षित आहे. परंतु, असे अभावानेच होताना दिसत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे, बाश्कळपणा आणि एकमेकांच्या नकला करणे हेच चित्र अनेक सभांमध्ये पहायला मिळते. दरम्यान, या नेत्यांना राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. आणि ते काम मतदारच करू शकेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. यासाठी ‘लॉकसत्ता’ने वाचकांना ऑनलाईन मंच उपलब्ध करून दिला आहे. तुमच्या दृष्टीने सर्वसामांन्यांच्या आणि राज्याच्या हिताचे महत्त्वाचे मुद्दे ‘ऑनलाईन कॉमेन्ट’ सुविधेचा वापर करून येथे नोंदवा. निवडक प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’ संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया पेजवर प्रसिध्द केल्या जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा