जालन्यात जे उपोषण सुरु आहे त्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडला. अशा प्रकारच्या बळाचं वापर करण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. यापूर्वीही पाच वर्षे मी गृहमंत्री होतो आणि जवळपास २ हजार आंदोलनं ही आरक्षणाच्या संदर्भातली झाली होती. परंतू कधीही आम्ही बळाचा उपयोग आम्ही केला नाही. आत्ताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. सर्वात आधी ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रति मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा निर्णयही घेण्यात आला आहे अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा