Lalit Patil Breaking News in Marathi : राज्यातील अमली पदार्थ व्यापारप्रकरणातील ललित पाटीलला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. कारण, विरोधकांनी केलेल्या आरोपांनुसार ललितला रुग्णालयात दीर्घकाळ ठेवण्याकरता आणि त्याला रुग्णालयातून फरार होण्याकरता राजकीय मंडळींनी मदत केली आहे. त्याला आजच तामिळनाडूच्या चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आज वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना एबीपी मराठीने ललित पाटीलशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हेही वाचा >> “ललितने कोणता मोठा गुन्हा केलाय?”, आईचा सवाल; म्हणाल्या, “त्याला फसवलं गेलंय, त्यामुळे…”

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी

२ ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा पथक त्याच्या मागावर होते. ललित पाटील चेन्नईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी चेन्नईतून ललितला अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या आईवडिलांनी ललितचं एन्काऊंटर होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसंच, ललितला आज अंधेरी कोर्टातही हजर केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्याने मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा >> “पोलीस नातवांना सांगतात, तुमची जिंदगी बरबाद”, ललित पाटीलच्या वडिलांचा आरोप; म्हणाले, “आई-बापाने…”

ललित पाटील पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी तो म्हणाला की, “मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे.” त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेले जात असताना, “मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे”, असंही ललित पाटील म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. या प्ररकणाला राजकीय वळण लागल्याने ललित पाटील कोणाची नावं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ललित पाटील नऊ महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात होता. तो इतके रुग्णालयात का दाखल होता? रुग्णालयातून तो कसा पळाला? ससूनमधून पळाल्यानतंर तो कुठे लपून बसला होता? चेन्नईत तो कसा पळाला? चेन्नईतून तो कुठे जाणार होता? तसंच, पलायन करण्याकरता त्याला कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहे. ललितची चौकशी केल्यानंतरच ही माहिती बाहेर येईल. याविषयी माहिती देण्याकरता मुंबई पोलीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत.