शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्ष धमकी येत असल्याची धक्कादायक माहिती पत्रकारपरिषदेत दिली. या बाबत उद्धव ठाकरे यांना कळवले असून सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत आणि राजन विचारे यांची देखील उपस्थिती होती.

नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे भाषण गाजल्याने राजकीय पटलावर त्या झळकल्या. आज(गुरुवार) वाशीत महाप्रबोधन मेळाव्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धमकीबाबत माहिती दिली.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
Neelam Rane on Nitesh Rane
Neelam Rane : “आई म्हणून मला भीती वाटते…”, नितेश राणेंबाबत नीलम राणेंना वाटते ‘ही’ काळजी!

हेही वाचा : विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण जर चाललं असेल, तर…; सुषमा अंधारेंचं मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून विधान

सुषमा अंधारे म्हणाल्या “माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय. काही इनपूट्स आले आहेत. ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका. कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन. काल विद्यापिठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे. मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे.”

मला शूट करतील का?… –

याचबरोबर “मला शूट करतील का? वेगवेगळ्या प्रकरणात किंवा विविध पद्धतीने. तर मला काय चिंता आहे, माझ्याकडे एक पाच वर्षांचं बाळ आहे. म्हणून मी आज अगदी जाहीरपणे सांगितलं की मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते, जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून त्याला सांभाळतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील.” असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे –

काल माझ्या घराखाली दोन पोलीस येऊन थांबले होते. त्यांनी काळजी घ्या असे सांगत काही वाटले तर आम्हाला सांगा असे सांगितले. याबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे. या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे. मला संरक्षण देण्याबाबत पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.