प्रसिद्ध किर्तनकार आणि सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका भाषणात त्यांना सर्वजण शिव्या देत असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदुरीकर महाराज म्हणाले, “असा माणूस राहिला नाही की त्याने मला शिव्या दिल्या नाहीत. माझा एकच गुन्हा आहे की मी फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो. थोडं वेगळं किर्तन आहे, पण काळाची गरज आहे. थोडं वाईट वाटतं लोकांना मी थेट बोलतो म्हणून. पण हाच पर्याय आहे.” दरम्यान इंदुरीकर महाराजांचा हा रोख नेमका कोणावर होता हे स्पष्ट झालेलं नाही.

“संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याला देव व्हायचं आहे त्याने संपत्ती आणि दया एकत्र केली पाहिजे. दान करायला शिका. पण ज्याला गरज आहे त्यालाच दान करा. सत्कार करा, पण गरिबाचाच करा. श्रीमंताचा सत्कार करून बरगड्या मोडू नये. खाऊन माजलेत त्याला अन्नाची गरज नाही. पण ज्याला गरज आहे त्याला द्या. गायीची केलेली सेवा, तुळशीला घातलेलं पाणी, किर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, वारकऱ्याला पाजलेला चहा, काळ्या आईची सेवा, सप्ताहाला दिलेला रुपया कधी फेल जात नाही, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.

हेही वाचा >> “आमदार होण्यासाठी दोन कारखाने, सहा कॉलेज अन्…”, इंदुरीकर महाराज यांचं विधान

सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात. तसंच ते कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात. या दरम्यान २०२० मध्ये आपल्या कीर्तनात पुत्रप्राप्तीविषयी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराजा विविध आयोजकांच्या कार्यक्रमांना जात असतात. त्यामुळे जिथं जातात तेथील आयोजकांचं कौतुकही करतात. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी किर्तन सोहळा आयोजित केला होता. याबाबत ते म्हणाले होते की, आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, १००-२०० पतसंस्था, १००-१५० बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार होता येतं. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I speak the truth and bear its fruits indurikar maharajs cash on whom exactly sgk