मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात फार जुनी मैत्री आहे. दोघंही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते असले तरी राजकारणापलीकडे त्यांची मैत्री होती. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आनंदच झाला, असं मोठं वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे. ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने तुम्हाला आनंद झाला की तुमच्यासाठी तो राजकीय धक्का होता? असा सवाल विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने मला आनंदच झाला. कारण तोपर्यंत माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते. १९९७-९८ पासून माझे एकनाथ शिंदेंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आमची मैत्री उघडपणाने नव्हती. आम्ही पैशांच्या देवाणघेवाणीत नव्हतो. पण कधी एकमेकांना काही मदत लागली तर आम्ही जरुर मदत करायचो.”

Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा- खळबळजनक! भर बैठकीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करत शरीराचे केले तुकडे

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी म्हटलं होतं, ‘चला, आता हक्काचा माणूस आला. त्यांच्या दारात जाऊन निधी मागू शकतो.’ तेव्हा माझ्या पक्षातील काही लोकांनी मला म्हटलं की, तू त्यांच्या दारात जाऊन निधी मागू, असं का म्हणालास? पण त्यात काय झालं. मतदारसंघासाठी कुणाच्या दारात जावं लागलं, तर हरकत आहे. आता हे (अजित पवार गट) विकासासाठी मोदींच्या दारात गेलेच ना.. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंच्या दारात गेलो, तर काय फरक पडतो. शेवटी मतदारसंघाच्या विकासासाठीच तर आपण आमदार असतो ना..” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा- “अक्कल नसलेल्या माणसाला…”, अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं सडेतोड उत्तर

आता तुमचे एकनाथ शिंदेंबरोबर संबंध कसे आहेत? तुमचं बोलणं होतं का? यावर जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “आता माझी आणि त्यांची कधी भेटही नाही. चर्चाही नाही. फोनही नाही. मला आता त्यांच्याकडे काही कामंही पडत नाही. त्यांच्याकडून निधी मिळणार नाही, ते आपल्याला सगळीकडून दाबण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला मतदारसंघात काम करू देणार नाहीत, हे सगळं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे उगीच त्यांच्या दारात जाऊन उभं कशाला राहायचं?”

Story img Loader