कर्जत : जामखेड मतदार संघामध्ये आज रविवारी जय अजित पवार यांनी महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यामुळे आता आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघामध्ये जय अजित पवार उभे राहणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबामध्ये संघर्ष सुरू झाला. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पवार कुटुंबीयांमध्ये बारामती व कर्जत जामखेड मतदार संघामध्ये संघर्ष होणार असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. बारामती मध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर अजित जय पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्यावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती त्यावर अजित पवार यांनी यावर पक्ष कोर कमिटी निर्णय घेईल असे जाहीर केले होते. तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या विरोधात अजित पवार यांच्यावर गुजरात मधून दिल्ली मार्गे उभा राहण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे असे सांगितले होते. यामुळे कर्जत जामखेड मतदार संघामध्ये देखील पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असे चित्र निर्माण झाले आहे.

NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

आणखी वाचा-Ajit Pawar : अजित पवार यांचं संजय राऊतांना उत्तर, “आई बापाने जन्म दिलाय म्हणून उचलली जीभ..”

आज तर जय अजित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये दौरा आयोजित केला आहे. ग्रामदैवत गोधड महाराज याच प्रमाणे राशीनेतील जगदंबा देवीचे दर्शन त्यांनी घेतल्या असून चोंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी महायुती पक्षातील काही प्रमुख नेत्यांची घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या तर काही नागरिकांशी देखील संवाद साधला.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की ही माझी राजकीय भेट किंवा दौरा नाही . पत्रकारांनी आपण पुन्हा येणार का अशी विचारणा केली असता नागरिकांनी जर मला परत बोलावले तर नक्कीच मला नागरिकांनी जर मला परत बोलावले तर नक्कीच मी परत येईल असे जय पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Story img Loader