बावळणसह चार प्रमुख रस्त्यांच्या कामास प्रारंभ
वर्षभरात परळी मतदारसंघात विविध विकासकामांसाठी ४०० कोटींचा निधी आणला. आपणास जनतेपासून कुठलाही स्वार्थ नको आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तरुणांच्या हाताला काम आणि शेतीला पाणी देण्याबरोबरच येत्या तीन वर्षांत मतदारसंघातील प्रत्येकाची पत पाचपटीने वाढेल असे काम करू, असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मी स्वत:च्या जीवावर आणि वडिलांच्या नावावर राजकारणात आहे. मला संपविण्याच्या धमक्या देऊन काही लोक स्वत:चा भाव वाढवून घेत आहेत. त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळून दिला. परळी शहराच्या बाह्यवळण रस्त्यासह प्रमुख चार रस्त्यांच्या एकूण ८३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. आमदार आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, फुलचंद कराड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंधरा वर्षे विरोधी पक्षात असताना जे करू शकले नाही, ते काम सत्तेत आल्यानंतर करण्याचे स्वप्न गोपीनाथ मुंडे यांनी बाळगले होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार ही त्यांचीच कल्पना होती, ती मी पुढे राबवत आहे. वैद्यनाथ साखर कारखाना आíथक संकटात असला, तरी शेतकऱ्यांचे पसे बुडवून इतरांच्या संस्थेसारखा आम्ही तो बंद केला नाही. स्वत: पदरमोड करून कारखाना चालू ठेवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अधीक्षक अभियंता श्रीनिवास कातकडे व कार्यकारी अभियंता एन. टी. पाटील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा