महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री झालेल्या त्यांच्या ताफ्यातील वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत, आज दिवसभर नगर मुक्कामी मौनच बाळगले. मात्र जालना येथे शनिवारी होणाऱ्या सभेत ते आपली भुमिका जाहीर करणार आहेत. शहरातील दौऱ्यात त्यांनी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधताना मतदासंघातील प्रश्न आक्रमकपणे सोडवत निवडणुकीची तयारी सुरु करण्यासही ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी दौरे सुरु केले आहेत. बीडहून काल रात्री त्यांचे नगरमध्ये आगमन झाले. भगवानगडावरुन पाथर्डी रस्त्याने नगरमध्ये येत असताना भिंगारमध्ये, मनसे व राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांत धुमश्चक्री उडाली, त्यातुन ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेक झाली. त्याच्या प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या. त्यामुळे ठाकरे काय भुमिका जाहीर करतात याकडे मनसेसैनिकांसह इतर पक्षीयांचेही लक्ष होते. परंतु याविषयी ठाकरे यांनी दिवसभर मौनच ठेवले. याविषयावर प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत असलेल्या पत्रकारांनाही त्यांनी टाळलेच. मात्र पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जालना सभेत बोलू असे सुतोवाच केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा